विद्यापीठ सिनेट निवडणूकः प्राचार्य, संस्थाचालक, विद्यापीठ शिक्षक प्रवर्गाचे निकाल जाहीर; संजय निंबाळकर पराभूत

औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत प्राचार्य, संस्थाचालक व विद्यापीठ शिक्षक गटातील १५ जागांचे निकाल घोषित झाले आहेत. विजयी उमेदवारांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थाचालक गटातून संजय निंबाळकर हे पराभूत झाले आहेत.

प्राचार्य गटात खुल्या प्रवर्गातून डॉ.बाबासाहेब माणिकराव गोरे (१५ मते), डॉ. भारत दत्तात्रय खंदारे (१४), डॉ.विश्वास शामराव कंधारे व डॉ.संजय लिंबराव कोरेकर हे १३ मतांच्या कोटा पूर्ण करुन विजयी झाले. तर डॉ.दादा रामनाळा शेंगुळे हे ९ मते घेऊन (बिलोकोटा) विजयी घोषित करण्यात आले. डॉ.गौतम भीमराव पाटील (अनुसूचित जातीप्रवर्ग- ४६ मते), डॉ.गोवर्धन कारभारी सानप (व्हीजेएनटी- ५२ मते),  डॉ.हरिदास गोपीनाथ विधाते (इतर मागास प्रवर्ग- ५० मते) हे विजयी झाले. तर डॉ.शिवदास झुलाल सिरसाठ हे बिनविरोध निवडून आले असून महिला गटातील जगा रिक्त राहिली आहे.

विद्यापीठ शिक्षक गटातून डॉ.भास्कर रामचंद्र साठे (खुला प्रवर्ग-६० मते), डॉ.वैशाली सोविंद खापर्डे (महिला-६९ मते), व डॉ.चंद्रकांत नामदेवराव कोकाटे (अनुसूचित जमाती-६५ मते) हे विजयी झाले आहेत.

संस्थाचालक गटात खुल्या प्रवर्गातून बस्वराज विश्वनाथ मंगरुळे (३५ मते), डॉ.मेहर दत्तात्रय पाथ्रीकर (३३ मते),  हे कोटा पूर्ण करुन विजयी झाले. तर गोविंद बालासाहेब देशमुख (३२ मते) व अशिलेष शिवाजीराव मोरे हे ’बिलो काटो’ (२८ मते) विजयी घोषित करण्यात आले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपपत्र देण्यात आले. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, निवडणूक समितीचे कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.प्रशांत अमृतकर आदींची उपस्थिती होती.

संस्थाचालक गटातून महिला प्रवर्गातून अर्चना बालासाहेब चव्हाण (अर्चना रमेश आडसकर) व नितीन उत्तमराव जाधव (अनुसूचित जताती प्रवर्ग) हे दोघे जण अगोदरच बिनविरोध निवडणून आले आहेत. निवडणूक प्रक्रियेचे संचालन डॉ.पी.व्ही.देशमुख व डॉ.कैलास अंभुरे यांनी केले. दरम्यान बॅडमिंटन कक्षात सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत प्राचार्य, संस्थाचालक, विद्यापीठ शिक्षक व अभ्यास मंडळाची निवडणूक प्रक्रिया संपली तर दुपारनंतर महाविद्यालयीन शिक्षक (१० जागा) व विद्या परिषद (सहा जागा) या गटातील मतमोजणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

अधिसभा गट, प्रवर्गनिहाय जागा, उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणेः

प्राचार्यः १० जागा (५ खुला प्रवर्ग, ५ राखीव)

विजयी उमेदवार(कंसात मिळालेली मते): डॉ.बाबासाहेब गोरे (१५), डॉ.विश्वास कंधारे (१३), डॉ.भारत खंदारे (१३), डॉ.संजय कोरेकर (१४), डॉ.दादा शेंगुळे (९).

पराभूत उमेदवारः डॉ.गणेश अग्नीहोत्री (८ मते), डॉ.दत्तात्रय वाघ (४), डॉ.राजकुमार मस्के (१).

अनुसूचति जमाती प्रवर्गः डॉ.शिवदास शिरसाठ (बिनविरोध),

अनुसूचित जाती प्रवर्गः डॉ.गौतम पाटील (४६ विजयी), पराभूतः डॉ.राजकुमार मस्के (३१),

भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्गः डॉ.गोवर्धन सानप (विजयी -५२), पराभूतः डॉ.राजेंद्र परदेशी (२१).

इतर मागास प्रवर्गः डॉ.हरिदास विधाते (५० विजयी), पराभूतः डॉ.शहाजहान मनेर (२४)

विद्यापीठ शिक्षकः ३ जागा.

खुला प्रवर्गः डॉ.भास्कर साठे (विजयी ६०) , डॉ.संजय साळुंके (४२) पराभूतः डॉ.सतीश दांडगे (३३), डॉ.अशोक पवार (१).

अनुसूचित जाती प्रवर्गः डॉ.चंद्रकांत कोकाटे (विजयी, ६५ मते), पराभूतः डॉ.गोपीचंद धरणे (४२), डॉ.भगवान गव्हाडे (१५).

महिला प्रवर्गः डॉ.वैशाली खापर्डे (विजयी, ६९ मते) पराभूतः डॉ.फराह गौरी नाझ (५२)

संस्थाचालकः ४ जागा

विजयी उमेदवारः बस्वराज मंगरुळे (३५), डॉ.मेहेर पाथ्रीकर (३३), गोविंद देशमुख (३२), अश्लेषा मोरे (२८).

पराभूत उमेदवारः संजय निंबाळकर (२८ मते), विनायक चोथे (१५), किशोर हंबर्डे (१७).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!