महाराष्ट्र

नोटिशीच्या धाकाला ‘न्यूजटाऊन’ बधणार नाही, सहसंचालक ठाकूर हिम्मत असेल तर आव्हान स्वीकारा आणि ‘या’ प्रश्नांची जाहीर उत्तरे द्या!
महाराष्ट्र, विशेष

नोटिशीच्या धाकाला ‘न्यूजटाऊन’ बधणार नाही, सहसंचालक ठाकूर हिम्मत असेल तर आव्हान स्वीकारा आणि ‘या’ प्रश्नांची जाहीर उत्तरे द्या!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  ‘उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा; अनुदान दिले पण निर्धारण न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा! हा न्यूजटाऊनने प्रसिद्ध केलेला एक्सक्लुझिव्ह वृतांत शिक्षण संस्थाचालकांबरोच उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही चांगलाच झोंबला आहे. उच्च शिक्षण विभागाचे पितळ उघडे पडणाऱ्या आणि त्यांच्या बुडाखालचा अंधार दाखवून देणाऱ्या या वृत्तांतामुळे औरंगाबादचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर हे चांगलेच चवताळले आणि त्यांनी न्यूजटाऊनला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी तर्कसंगत पुरावे देऊन न्यूजटाऊनचे आरोप फेटाळण्याचे धारिष्ट्य दाखवावे. न्यूजटाऊनचे हे आव्हान स्वीकारून डॉ. ठाकूर यांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे त्यांना न्यूजटाऊनचे खुल आव्हान आहे. औरंगाबादच्या विभागीय सहसंचालकांना विभागातील अन...
 अनुदान घोटाळ्याच्या वृत्ताने सहसंचालक ठाकूर यांचे पित्त खवळले, नोटिशीचा धाक दाखवून ‘न्यूजटाऊन’चा आवाज दाबण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र, विशेष

 अनुदान घोटाळ्याच्या वृत्ताने सहसंचालक ठाकूर यांचे पित्त खवळले, नोटिशीचा धाक दाखवून ‘न्यूजटाऊन’चा आवाज दाबण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ‘उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा; अनुदान दिले, पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!’ हा न्यूजटाऊनने प्रसिद्ध केलेला विशेष वृतांत औरंगाबादचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांना चांगलाच झोंबल्यामुळे त्यांचे पित्त खवळले असून त्यांनी न्यूजटाऊनला तब्बल पाच पानी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आम्ही कर्तव्यपरायणता दाखवली आणि नियमित अनुदान निर्धारण केले, याचा मात्र डॉ. ठाकूर यांच्या नोटिशीत कुठेही उल्लेख नाही. उच्च शिक्षण विभागाकडून राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना दरमहा नियमित अनुदान देण्यात आले परंतु दिलेल्या अनुदानाचा योग्य विनियोग झाली की नाही, याचे दरवर्षी अनुदान निर्धारणच केले नसल्यामुळे १० हजार कोटींहून जास्त रकमेचा अनुदान घोटाळा झाला आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याबद्दलचा विशेष वृत्तांत न्यूजटाऊनने १...
औरंगाबादच्या प्रशासन अधिकारी सांजेकर गोत्यात, उच्च शिक्षण संचालकांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश; १५ दिवसांत अहवाल
महाराष्ट्र

औरंगाबादच्या प्रशासन अधिकारी सांजेकर गोत्यात, उच्च शिक्षण संचालकांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश; १५ दिवसांत अहवाल

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी वनिता उदयराव उर्फ व्ही. यू. सांजेकर यांच्या चौकशीसाठी मुंबईचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. सांजेकर यांच्याविरुद्धची चौकशी करून १५ दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. सांजेकर यांच्या कार्यपद्धतीबाबत उच्च शिक्षण संचालकांकडे नोव्हेंबर २०२२ पासून एकूण सात तक्रारी प्रलंबित आहेत. त्यात लोहारा येथील भारतीयराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण संघटना, उस्मानाबाद, औरंगाबाद, स्वाभिमानी मुप्टा,  वैजापूरच्या चेतना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, विद्यापीठाचे अधिसभा व स्थायी समिती सदस्य आणि अन्य शिक्षक संघटनांचा समावेश आहे...
दडी मारलेला पाऊस करणार जोरदार पुनरागमन, हवामान विभागाने ‘या’ भागाला दिला मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र

दडी मारलेला पाऊस करणार जोरदार पुनरागमन, हवामान विभागाने ‘या’ भागाला दिला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून हा अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. २१ ऑगस्टपर्यंत राज्याच्या काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे उभी पिके करपू लागल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. जुलै महिन्यात हजेरी लावलेला पाऊस पुन्हा गायब झाल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. हवामान विभागाने विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे ...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार तरी कधी?, मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले…
महाराष्ट्र

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार तरी कधी?, मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले…

मुंबई: चालू वर्षी कांदा उत्पादन हंगामात कांद्याचे बाजारभाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतीक्विंटल ३५० रुपयांप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत प्रतिशेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. परंतु हे अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार? याची प्रतीक्षा आहे. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत माहिती दिली आहे. कांदा उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी वित्त विभागाने पणन विभागाला ४६५ कोटी ९९ लाख रुपये निधी वितरीत केला आहे. लवकरच कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. कांद्याच्या दरात झालेल्या अभूतपूर्व घसरणीनंतर या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी दिनांक २७ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना सानुग्रह...
सहकारी संस्थांच्या कारभारातील हस्तक्षेपाचा अध्यादेश मागे, दोन्ही काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ
महाराष्ट्र, राजकारण

सहकारी संस्थांच्या कारभारातील हस्तक्षेपाचा अध्यादेश मागे, दोन्ही काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ

मुंबईः सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करून विरोधकांची कोंडी करण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करणारा शिंदे-फडणवीस सरकारने काढलेला अध्यादेश उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या दबावामुळे शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मागे घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. त्यामुळे राज्याच्या सहकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी आहे. ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश ७ जून २०२३ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता. वर्ष २०२३ चा अध्यादेश क्रमांक २ हा मागे घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. क्रियाशील सदस्यांबाबतचा मजकूर वगळणारा अधिनियम...
अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी भाडेवाढीचा निर्णय, वीज सुविधा असलेली इमारतच भाड्याने घेणे अनिवार्य!
महाराष्ट्र

अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी भाडेवाढीचा निर्णय, वीज सुविधा असलेली इमारतच भाड्याने घेणे अनिवार्य!

मुंबई: केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्र इमारतींसाठी भाडेवाढ करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. ग्रामीण, आदिवासी क्षेत्रांत दोन हजार रुपये, नागरी क्षेत्रांमध्ये (नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका) सहा हजार रुपये, महानगर क्षेत्रांमध्ये आठ हजार रुपये दरमहा वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अंगणवाडी इमारत भाडेदरामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. अंगणवाड्यामध्ये मुलभूत सोयीसुविधांच्या वाढीसाठी भर देण्यात आला आहे. निर्धारित मासिक भाडे हे स्थानिक कर, मेंटनन्स, इतर अनुषंगिक कर तसेच वीज बिलासह निर्धारित राहतील. ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात अंगणवाडी, मिनी अंगणवाडी इमारतींसाठी मासिक भाडे दोन हजार रूपये दे...
जळगावात राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, सुवर्ण नगरीत खळबळ
महाराष्ट्र

जळगावात राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, सुवर्ण नगरीत खळबळ

जळगावः माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने कारवाई करत चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत मोठी खळबळजनक उडाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्भात ईडीच्या पथकाने ही कारवाई केली. ईडीच्या पथकाच्या १० गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी करत कारवाई केली. ईडीच्या पथकाने सर्व ठिकाणाच्या मालमतात आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमध्ये ईडीचे एकूण ६० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.राजमल लखीचंद उर्फ आर. एल. ज्वेलर्सवर कारवाई सुरू झाल्यानंतर ...
लोकसभा निवडणुकीत मविआ ४० ते ४५ जागा जिंकणारः काँग्रेसच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; फडणवीस-शिंदे-पवार ट्रिपल इंजिनची हवा गुल?
महाराष्ट्र, राजकारण

लोकसभा निवडणुकीत मविआ ४० ते ४५ जागा जिंकणारः काँग्रेसच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; फडणवीस-शिंदे-पवार ट्रिपल इंजिनची हवा गुल?

मुंबईः एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा ट्रिपल इंजिनची मोट बांधून महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना मोठा सुरुंग लागण्याची शक्यता दिसू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत ४० ते ४५ जागा जिंकेल असा दावा काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहता भाजपसाठी आगामी लोकसभा निवडणूक जिंकणे किती अवघड होऊ शकते, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले ...
उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा, अनुदान दिले पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!
महाराष्ट्र, विशेष

उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा, अनुदान दिले पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!

सुरेश पाटील/ छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): राज्याच्या उच्च शिक्षण विभागात एक दोन नव्हे तर तब्बल १० हजार कोटींहून जास्त रकमेचा अनुदान घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. उच्च शिक्षण विभागाने राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना दरमहा नियमित अनुदान तर दिले परंतु त्या अनुदानाचा योग्य विनियोग झाला की नाही, याचे दरवर्षी अनुदान निर्धारणच केले नसल्यामुळे महाविद्यालयाच्या बँक खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमा संस्थाचालकांनी गिळंकृत करून टाकल्या. त्यातून हा कोट्यवधींचा घोटाळा झाला. औरंगाबाद विभागातील अनुदान घोटाळ्याची ही रक्कम एक हजार कोटींच्या घरात जाते, अशी माहिती उच्च शिक्षण खात्यातील सूत्रांनी दिली.  राज्याच्या ३६ जिल्ह्यात एकूण ४ हजार ३४६ अशासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये आहेत. त्यापैकी २ हजार ५७० कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये कायम विनाअनुदानित तत्वावर आहे...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!