महाराष्ट्र

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; जिल्हा परिषद,अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही लाभ
महाराष्ट्र, विशेष

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; जिल्हा परिषद,अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही लाभ

मुंबई: येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.   एरवी ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी २२ ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल.  वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत....
तलाठी भरतीला मुहूर्त: पहिल्या टप्प्यात होणार एक हजार पदांची भरती!
महाराष्ट्र

तलाठी भरतीला मुहूर्त: पहिल्या टप्प्यात होणार एक हजार पदांची भरती!

मुंबई, : महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी आज दिले. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.  गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे ३ ते ४ गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याब...
फडणवीस- बावनकुळेंची नागपुरात धक्कादायक नामुष्की, १३ पंचायत समित्यांमध्ये भाजपची पाटी कोरीच!
महाराष्ट्र, राजकारण, विशेष

फडणवीस- बावनकुळेंची नागपुरात धक्कादायक नामुष्की, १३ पंचायत समित्यांमध्ये भाजपची पाटी कोरीच!

नागपूरः जंग जंग पछाडून राज्याची सत्ता हस्तगत करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांचा गृह जिल्हा नागपुरातच धक्कादायक नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी एकाही पंचायत समितीत भाजपला एकही सभापतिपद जिंकता आलेले नाही. या १३ पंचायत समित्यांपैकी ९ पंचायत समित्यांत काँग्रेस तर ३ पंचायत समित्यांचे सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेले असून एका ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेचा सभापती झाला आहे. पक्षनिहाय पंचायत समित्यांचे सभापती असेः काँग्रेसः सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी, कामठी, मौदा, कुही, उमरेड, भिवापूर, नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसः कोटोल, नरखेड आणि हिंगणा. बाळासाहेबांची शिवसेनाः रामटेक. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याच्या राजकारणाची खडानखडा माहिती असूनही ...
अंधारात ‘दिवे’: झाकोळल्या रात्री कृषिमंत्री सत्तारांनी केली गंगापूर, वैजापुरात पीक नुकसानीची पाहणी
महाराष्ट्र, राजकारण, विशेष

अंधारात ‘दिवे’: झाकोळल्या रात्री कृषिमंत्री सत्तारांनी केली गंगापूर, वैजापुरात पीक नुकसानीची पाहणी

औरंगाबाद: सिल्लोडचे एकेकाळी काँग्रेसचे, आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार आणि विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतातच. त्यांच्या कामाचा 'झपाटा' एवढा आहे की ते वेळकाळही पहात नाहीत. त्यामुळेच त्यांनी शनिवारी सायंकाळी अंधारून आलेले असतानाही 'दिवे' लावून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे 'कृतीशील' लोकप्रतिनीधी म्हणूनच ओळखले जातत. तशी त्यांची प्रत्येकच 'कृती' आगळीवेगळी असते आणि म्हणूनच ती चर्चेचा विषयही ठरते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मुंबईतील दसरा मेळाव्याला त्यांनी शंभर बसेस भरून लोक पाठवले होते. त्याची औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर सगळीकडेच भरपूर चर्चा झाली. ही चर्चा थांबते न थांबते...
पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार
महाराष्ट्र

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार

मुंबई : पोलिसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. ४० वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेन्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलिसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी सह पोलीस आयुक्त (वाहतूक) राजवर्धन, सेवेन्स टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अनिल जग्यासी, अपोलो क्लिनिकचे संचालक डॉ. संजय कपोते, निशा चॅरिटी यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अपोलो क्लिनिकचे संचालक श्कपोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे राबविलेला पोलीस आरोग्य तपासणी कार्यक्रम अतिशय ...
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर
महाराष्ट्र, राजकारण

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने १६६ - अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुटी अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे  जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुटी लागू राहील.  या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ...
एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थीः ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप
महाराष्ट्र, राजकारण

एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थीः ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

यवतमाळः राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थी आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ हवी आहे. मात्र ते एसटीच्या चोरीवर गप्प आहेत. ते बोलत नाहीत, म्हणजेच ते या लुटीत सहभागी आहेत. ते चोर आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  प्रकाश आंबेडकर हे शुक्रवारी यवतमाळमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर हा गंभीर आरोप केला आहे. एसटीचे कर्मचारी स्वार्थी आहेत. ते केवळ स्वतःच्या पगाराचा विचार करतात. ते एसटीच्या लुटीवर बोलत नाहीत. ते या लुटीवर बोलत नसतील तर तेही या लुटीत सहभागी आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.  सध्या राज्यात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आ...
ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी सूचवलेली गावांतर्गत सर्वच मंजूर कामे रद्द, शिंदे सरकारचा आणखी एक आदेश
महाराष्ट्र, विशेष

ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी सूचवलेली गावांतर्गत सर्वच मंजूर कामे रद्द, शिंदे सरकारचा आणखी एक आदेश

मुंबईः  महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावलेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या तावडीतून लोकप्रतिनिधीही सुटले नाहीत.  ग्रामीण भागात गावातंर्गत मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सूचवलेली सर्वच्या सर्व कामे रद्द करण्यात आली आहेत. याबाबतचा शासन आदेश १२ ऑक्टोबर रोजी काढण्यात आला आहे. ग्राम विकास विभागाने काढलेल्या शासन आदेशानुसार ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील म्हणजेच १ एप्रिल २०२१ पासून मंजूर केलेली सर्व कामे रद्द करण्यात आली आहेत. रद्द करण्यात आलेली ही सर्व कामे लोकप्रतिनिधींनी सूचवलेली आहेत.  रद्दा करण्यात आलेल्या कामांत लेखाशिर्ष २५१५ १२३८ चा समावेश आहे. राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणीं...
न्यूजटाऊन इम्पॅक्टः भूखंड वाटपाला स्थगिती ही राज्याची अधोगतीः राषट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे टिकास्त्र
महाराष्ट्र, विशेष

न्यूजटाऊन इम्पॅक्टः भूखंड वाटपाला स्थगिती ही राज्याची अधोगतीः राषट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे टिकास्त्र

मुंबई: विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे. भूखंड वाटपाला स्थगिती देणे हे उद्योजकांवरचे फार मोठे संकट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थगिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. न्यूजटाऊनने हे वृत्त दिले होेते. मागच्या वर्ष -दीड वर्षात जे निर्णय वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी किंवा महाराष्ट्रातील हजारो गावांना जो निधी दिला तो थांबवण्याचे काम जर या सरकारने केले तर त्या गावांची प्रगती थांबवली, प्रगतीत अडथळा निर्माण केला असा होतो असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.हे सरकार मागे बघायला लागले तर ते कधीच पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे यासरकारने मागे न बघता पुढचा विकास म्हणजे भविष्य याकडे बघून चालावे असा सल्लाही जयंत पाटील यांनी दि...
न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीसीच्या भूखंड वाटपाची स्थगिती त्वरित उठवा: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, विशेष

न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीसीच्या भूखंड वाटपाची स्थगिती त्वरित उठवा: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विविध स्तरावर भूखंड वाटपाला  देण्यात आलेली स्थगिती त्वरित उठवण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून केली आहे. न्यूजटाऊनने याबाबतचे वृत्त दिले होते. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर उद्योगांसाठीच्या जमिनीबाबत पुनर्वलोकन केलं जात असल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २० सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भूखंड वाटपास दिलेली स्थगिती उठवण्यात आली असल्याचे म्हटले. मात्र आज २२ दिवस उलटूनही भूखंड स्थगिती बाबतचा निर्णय जैसे थे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देत दानवे यांनी भूखंड स्थगितीबाबतचे आदेश निर्गमित न झाल्याने भूखंडाच्या निर्णयाबाबतची कार्यवाही ठप्प झाल्याचे...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!