देश

व्यापाऱ्यांना दिलासाः राज्यात सात जीएसटी अपिलीय न्यायाधिकरण स्थापन होणार, अर्थ खात्याच्या निर्णयाची वन मंत्र्यांनी दिली माहिती
देश

व्यापाऱ्यांना दिलासाः राज्यात सात जीएसटी अपिलीय न्यायाधिकरण स्थापन होणार, अर्थ खात्याच्या निर्णयाची वन मंत्र्यांनी दिली माहिती

नवी दिल्ली:  वस्तू व सेवाकर परिषदेच्या ५० व्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये सात अपिलीय न्यायाधिकरण (ट्रिब्युनल) स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. वित्त मंत्रालयाच्यावतीने आज वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५० वी बैठक येथील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या. बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. महाराष्ट्राचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या परिषदेस राज्याच्यावतीने उपस्थित होते. यासह राज्याच्या वित्त सचिव शैला ए. आणि जीएसटी आयुक्त राजीव कुमार मित्तल उपस्थित होते. आज पार पडलेल्या 50व्या बैठकीत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. आज झालेल्या वस्तू व सेवाकर परिषदेच्या महत्वाच्या बैठकीत राज्यात वस...
आता पुढचा भूकंप सत्ताधारी भाजपमध्ये, पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार? सोनिया गांधी-पंकजांच्या गुप्त भेटीची चर्चा
देश, राजकारण

आता पुढचा भूकंप सत्ताधारी भाजपमध्ये, पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार? सोनिया गांधी-पंकजांच्या गुप्त भेटीची चर्चा

मुंबईः अजित पवार यांनी काकांविरुद्ध बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यामुळे झालेल्या राजकीय भूकंपामुळे बसलेले हादरे अजून शांत व्हायचे असतानाच महाराष्ट्रात आणखी एका राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची गुप्त भेट घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचेही सांगितले जात आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी  आणि राहुल गांधी यांची नवी दिल्लीत दोनवेळा गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरू असलले राजकीय घमासान आणखी वाढण्याचे संकेत आहेत. शिवसेना- राष्ट्रवाद...
सहायक प्राध्यापकपदासाठी आता नेट/सेट हीच किमान अर्हता अनिवार्य, पीएच.डी.ची दुकानदारी बंद!
देश

सहायक प्राध्यापकपदासाठी आता नेट/सेट हीच किमान अर्हता अनिवार्य, पीएच.डी.ची दुकानदारी बंद!

नवी दिल्लीः  विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकपदासाठी पीएच.डी. ही अर्हता अनिवार्य करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मागे घेतला असून आता या पदाच्या भरतीसाठी नेट/सेट ही किमान अर्हता अनिवार्य करण्यात आली आहे. १ जुलै २०२३ पासून हा नवीन नियम लागू राहील, असे यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. यूजीसीच्या या निर्णयामुळे पीएच.डी.ची दुकानदारी बंद होणार आहे. सहायक प्राध्यापकाच्या थेट भरतीसाठी आता पीएच.डी. ही अर्हता अनिवार्य राहणार नसल्यामुळे पीएच.डी.चे संशोधक छात्र आणि त्यांचे मार्गदर्शक यांचाही चांगलाच हिरमोड झाला आहे. यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांच्या स्वाक्षरीनिशी भारताच्या राजपत्रात यूजीसीची ही अधिसूचना ३० जून २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, राज्यस्तरीय विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्याप...
बंडाच्या दोन दिवस आधीच अजित पवार गटाकडून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ‘हकालपट्टी’!
देश, राजकारण

बंडाच्या दोन दिवस आधीच अजित पवार गटाकडून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ‘हकालपट्टी’!

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दोन दिवस आधीच अजित पवार गटाने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ‘हकालपट्टी’ करत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ या पक्षचिन्हावरच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरही दावा ठोकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अजित पवार गटाने बंडाच्या दोन दिवस आधीच निवडणूक आयोगाला ईमेल पाठवून ही खेळी खेळल्याचे उघड झाले आहे.  अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज आणि शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांना सोबत घेऊन रविवारी (२ जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्याच्या दोन दिवस आधीच अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक ईमेल पाठवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ...
मुख्यमंत्री शिंदे नागपूर दौरा अर्धवट सोडून तडकाफडकी मुंबईला रवाना, महाराष्ट्रात पुन्हा एका राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण!
देश, राजकारण

मुख्यमंत्री शिंदे नागपूर दौरा अर्धवट सोडून तडकाफडकी मुंबईला रवाना, महाराष्ट्रात पुन्हा एका राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण!

नागपूर/मुंबईः  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नियोजित नागपूर दौरा अर्ध्यावरच सोडून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या शिवसेना(शिंदेगट) आमदारांच्या तोंडचे पाणी पळवत राष्ट्रवादीचे अजित पवार हे सरकारमध्ये  सामील झाले आणि उपमुख्यमंत्रिपदासह त्यांनी आठ मंत्रिपदेही मिळवली. त्यामुळे स्वपक्षीयात निर्माण झालेली नाराजी आणि मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी मुंबईला रवाना होण्याचा निर्णय या दोन गोष्टींना जोडून राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जाऊ लागली आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या नागपूर आणि गडचिरोली दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यासाठी आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नागपुरात त्यांचे आगमन झाले. राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना राजभवनात सोडले आणि त्यानंत...
समृद्धी महामार्गावरील अपघातात जो मृत्यू पावतो, तो ‘देवेंद्रवासी’ होतो असे लोक बोलतातः शरद पवार
देश, राजकारण

समृद्धी महामार्गावरील अपघातात जो मृत्यू पावतो, तो ‘देवेंद्रवासी’ होतो असे लोक बोलतातः शरद पवार

मुंबईः समृद्धी महामार्गावरील अपघातात जो व्यक्ती मृत्यू पावतो, तो ‘देवेंद्रवासी’ झाला असे लोक बोलतात. तो रस्ता तयार करण्याच्या संबंध काळात निर्णय घेण्यात, नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सामान्य लोक कळत-नकळत दोषी ठरवतात. पण आज झालेली अपघाताची घटना अत्यंत दुःखद आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.  समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. समृद्धी महामार्गाच्या बांधकामात त्रुटी, कमतरता असल्याची शक्यता शरद पवार यांनी बोलून दाखवली. समृद्धी महामार्गावरील बसच्या अपघाताचे कारण कदाचित या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने नियोजन न करणे, हे असावे. त्या...
शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी, विविध श्रेणीत पटकावले पाच पुरस्कार
देश

शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी, विविध श्रेणीत पटकावले पाच पुरस्कार

नवी दिल्ली:  महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण ५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये  शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी  ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार-२०२३’ प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने शासकीय-ई-बाजारपेठ प्रणाली २०१६ पासून विकसित केली असून या अंतर्गत शासनाला लागत असलेल्या सेवा सामुग्रीचा पुरवठा जेमच्या माध्यमातून केला जातो. राज्य शासन, विविध विभाग, महिला उद्योजक, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकांना य...
बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड, युवा साहित्यिक विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमी पुरस्कार!
देश

बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड, युवा साहित्यिक विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमी पुरस्कार!

नवी दिल्ली: साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल  साहित्यासाठी  बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’  या कविता संग्रहास ‘बाल’  साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी ३ सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी  करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षा...
सुधा भारद्वाज, प्रा. हरगोपाल यांच्यासह १५२ जणांविरुद्ध दाखल ‘यूएपीए’च्या केसेस तेलंगण सरकार ‘वापस’ घेणार!
देश

सुधा भारद्वाज, प्रा. हरगोपाल यांच्यासह १५२ जणांविरुद्ध दाखल ‘यूएपीए’च्या केसेस तेलंगण सरकार ‘वापस’ घेणार!

हैदराबादः  तेलंगण सरकारने सुधा भारद्वाज, प्रोफेसर हरगोपाल यांच्यासह १५२ जणांविरुद्ध दाखल केलेले बेकायदेशीर कृत्य( प्रतिबंधक) अधिनियमांतर्गतचे (यूएपीए) खटले पुढे न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्याच्या पोलिस प्रमुखांना हे खटले ‘वापस’ घेण्याचे निर्देश दिले आहेत.  द हिंदूने या संबंधीचे वृत्त दिले आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्याचे पोलिस प्रमुख (डीजीपी) अंजनीकुमार यांच्याकडे या प्रकरणाबाबत चौकशी केली आणि या प्रकरणात यूएपीएसारखा कठोर कायदा लागू करण्याच्या आवश्यकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच निर्देश दिल्यामुळे  तेलंगण पोलिस आता यूएपीए अंतर्गत दाखल केलेले हे खटले मागे घेतले जाऊ शकतात काय, याची पडताळणी करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  आता हे खटले पुढे चालवले जाणार नाहीत आ...
३३० कोटी रुपये खर्चून तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील कालव्यांचे होणार पुनरुज्जीवन, महाराष्ट्र-गोव्याला होणार लाभ
देश

३३० कोटी रुपये खर्चून तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील कालव्यांचे होणार पुनरुज्जीवन, महाराष्ट्र-गोव्याला होणार लाभ

मुंबईः महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या प्रमुख उपस्थित सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. आपले विचार एक आहेत. त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येऊन खूप काही करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. गोवा महाराष्ट्राचा लहान बंधू आहे. त्यामुळे गोव्याच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा असतील, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!