Blog

‘साहेब आणि दादा आजही एकत्रच, काळजी करू नका,’ शरद पवारांबद्दल अजितदादांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा संभ्रम वाढला!
महाराष्ट्र, राजकारण

‘साहेब आणि दादा आजही एकत्रच, काळजी करू नका,’ शरद पवारांबद्दल अजितदादांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा संभ्रम वाढला!

पुणेः अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि ते भाजपशी हातमिळवणी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होते उपमुख्यमंत्री बनले. शरद पवारांच्या संमतीनेच या राजकीय घडामोडी घडल्या की काय? अशी शंका तेव्हाच राजकीय वर्तुळात घेण्यात आली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या नव्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ‘साहेब आणि मी तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आजही वेगळे नाही, काळजी करू नका,’ असे अजित पवार यांनी म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात आले होते. शिरूरचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारकाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत जोरदार राजकीय टोलेबाजी केली. शिरूर विधानसभा मतदा...
महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य: प्रधानमंत्री मोदी
देश

महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य: प्रधानमंत्री मोदी

पुणे: पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे ते आपले सौभाग्य आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला सन्मान आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स.प. महाविद्यालयात आयोजित समारंभात प्रधानमंत्री मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र...
एम. फिल. चे लघुशोधप्रबंध सादर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय
महाराष्ट्र

एम. फिल. चे लघुशोधप्रबंध सादर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम.फिलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे लघुशोधप्रबंध सादर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार एम.फिल. अभ्यासक्रम दोन वर्षापासून बंद करण्यात आला आहे. तथापि २०२०-२१ या अंतिम बॅचच्या विद्यार्थ्यांना शोधप्रबंध दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही सदर तारीख वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कुलगुरू डॉ. येवले यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ च्या कलम (१२)(७) अन्वये विहित केल्यानुसार अधिष्ठाता मंडळ व विद्या परिषदेच्या वतीने एम.फिल. करत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा म्हणून लघुशोधप्रबंध सादर करण्या...
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांच्या खांद्यावर दुसऱ्यांदा सोपवली जबाबदारी!
महाराष्ट्र, राजकारण

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांच्या खांद्यावर दुसऱ्यांदा सोपवली जबाबदारी!

मुंबईः महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यास तीनच दिवस शिल्लक असताना काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसकडे आले आहे. विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद विदर्भातच असतानाच काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदही विदर्भाकडेच सोपवले आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही संख्याबळ कमी आहे. तुलनेने काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्यामुळे व...
छत्रपती संभाजीनगर हादरलेः महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घुसून तरूणांकडून अचानक गोळीबार, दाम्पत्य बचावले!
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर हादरलेः महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घुसून तरूणांकडून अचानक गोळीबार, दाम्पत्य बचावले!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दाम्पत्यावर अज्ञात तरूणांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) घडली. सोमवारी (३१ जुलै) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर परिसरातील हनुमाननगरातील गल्ली नंबर ५ मध्ये ही घटना घडली. गोळीबार झाला तेव्हा हे दाम्पत्य घरात स्वयंपाकाची तयारी करत होते. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रभू आनंद अहिरे हे ६१ वर्षीय गृहस्थ आणि त्यांची पत्नी घरात स्वयंपाकाची तयारी करत असताना दोन अज्ञात तरूणांनी अचानक घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. प्रभू हिरे औरंगाबाद महानगरपालिकेतून सफाई कर्मचारी म्हणून निवृत्त झाले आहेत. हिरे दाम्पत्य नुकतेच हनुमाननगरात रहायला आले आहेत. हे दोघेही घरी असताना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रभू अहिरे यांची पत्नी घरात स्वयंपाकाची तयारी करत होत्...
पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार
देश

पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार

मुंबई: पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात ७ लाख २० हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाब...
‘डॉ. बामू’च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, ५५ विभागात रिक्त जागांवर मिळणार थेट प्रवेश
महाराष्ट्र

‘डॉ. बामू’च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, ५५ विभागात रिक्त जागांवर मिळणार थेट प्रवेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उस्मानाबाद येथील उपपरिसरातील सर्व पदव्युत्तर विभागात प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ज्या विभागात जागा रिक्त असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या तीन टप्प्यात ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. प्रवेशित विद्यार्थ्यांची जागेवरच सर्व प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यात आली. प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, उपकुलसचिव डॉ.आय.आर.मंझा, आदींसह प्रवेश समितीच्या २२ सदस्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. विद्यापीठाने यापूर्वी घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार निर्धारित कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन...
‘अशाच बोलत राहिलात तर तुमचा दाभोळकर करू’, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्र, राजकारण

‘अशाच बोलत राहिलात तर तुमचा दाभोळकर करू’, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबईः राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘अशाच बोलत राहिलात तर तुमचा दाभोळकर करू’ असे ट्विट करून ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर ठाकूर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. याच मुद्यावर आक्रमक भूमिका घेत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची ...
धावत्या जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेत आरपीएफ जवानाचा गोळीबार, ४ जणांचा मृत्यू
देश

धावत्या जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेत आरपीएफ जवानाचा गोळीबार, ४ जणांचा मृत्यू

मुंबईः जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आज सोमवारी पहाटे पाच वाजता गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रेल्वे पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गोळीबार करून आरपीएफ जवान चालत्या गाडीतून उडी मारून फरार झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आणण्यात आली असून पोलिसांना पुढील तपास सुरू केला आहे. गाडी क्रमांक १२९५६ जयपूर-मुंबई ही सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. या रेल्वेत सुरक्षेसाठी तैनात असलेला आरपीएफ जवान चेतनकुमार सिंह याने बोगी क्रमांक बी-५ मध्ये आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला. या गोळीबारात रेल्वे पोलिस दलातील सहायक निरीक्षक टिकाराम यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर चेतनकुमार सिंह हा दहिसर रेल्वेस्थानकाजवळ चालत्या रेल्वेतून उडी...
संभाजी भिडे हे अफजलखानाच्या वकिलांचे वंशज, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा मोठा दावा
महाराष्ट्र, राजकारण

संभाजी भिडे हे अफजलखानाच्या वकिलांचे वंशज, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा मोठा दावा

अमरावती/मुंबईः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली असून भिडेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने केली जात असतानाच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंच्या बाबत मोठा दावा केला आहे. संभाजी भिडे हे अफजल खानाच्या वकिलांचे वंशज असल्याचा दावा केला आहे. हा माणूस इतका घाणेरडा आहे. संभाजी भिडे (मनोहर कुलकर्णी) ज्या भागातून येतात तेथे फोन लावला आणि हा माणूस कसा आहे असे विचारले. तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितले की, संभाजी भिडे अफजल खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचे वंशज आहेत. म्हणजे हे वंशज कोणाचे, नाव काय ठेवतात, बोलतात काय? दुसरीकडे सरकार त्यांना खुलेपणाने फिरू देत आहे, असे यशोमत...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!